परिसर

दिल्ली

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

UPI ImageMadhura Manbhekar

UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! व्यवहार मोफतच, व्यापाऱ्यांवरही कोणताही अतिरिक्त भार नाही

UPI व्यवहारांवर 2026 मध्ये ग्राहकांकडून नवीन शुल्क आकारले जाणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, नियमित बँक-टू-बँक UPI पेमेंटसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्याची कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. भविष्यात MDR लागू झाल्यास त्याचा भार व्यापाऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे.

shivsenaGayatri Laxmikant Mali

"शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात सुनावणी; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवाल"

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानता येत नाही, तसेच शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने अपात्रतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

Brij Bhushan Sharan Singh ImageMadhura Manbhekar

महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सहआरोपी विनोद तोमर यांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले. 2016 ते 2019 या काळातील कथित लैंगिक छळाच्या आरोपांनंतर 2023 मध्ये कुस्तीपटूंनी मोठे आंदोलन केले होते. निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी हा "सन्मानाने मिळालेला न्याय" असल्याचे म्हटले, तर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

NEET PG ImageMadhura Manbhekar

NEET-PG 2026 साठी नवे नियम लागू; घराजवळ केंद्र, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आणि कडक सुरक्षा

NEET-PG 2026 परीक्षेसाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना घराजवळ परीक्षा केंद्र मिळावे यासाठी केंद्र निवडीची नवीन पद्धत लागू करण्यात आली असून, परीक्षा शहराची माहिती तीन आठवडे आधी दिली जाणार आहे. यंदा 200 ऐवजी 180 प्रश्न असतील आणि त्यासाठी 210 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार असून, आधार पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि कडक सुरक्षा उपायांमुळे परीक्षा अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. NEET-PG 2026 साठी 2.73 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, देशभरातील 340 शहरांमध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI चे आरोपपत्र; NTA चे 3 विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग संस्थांशी संबंधित 13 जण अडचणीत

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने मोठी कारवाई करत NTA चे तीन विषयतज्ज्ञ, अनेक मध्यस्थ आणि दोन कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींसह एकूण 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 360 साक्षीदार, 422 कागदपत्रे आणि 43 भौतिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 92 ठिकाणी छापेमारी करून तपास यंत्रणेने पेपरफुटीची संपूर्ण साखळी उघड केल्याचा दावा केला असून, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास CBI कडून सुरू आहे.

narendra modi with frinedSakshi Megha Prabhu

पेपर लीक रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, 'परीक्षा सुधारणा टास्क फोर्स'ची घोषणा!

भारतातील परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि पेपर लीकच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ६ सदस्यीय उच्चस्तरीय 'परीक्षा सुधारणा टास्क फोर्स'ची घोषणा केली आहे. या समितीचे अध्यक्षपद 'आधार'चे जनक नंदन निलेकणी भूषवणार असून, यात इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, आयबीचे माजी संचालक तपन कुमार डेका, आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामкоटी, सीबीएसईच्या माजी अध्यक्षा अनिता करवाल आणि अमृत लाल मीना यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) संपूर्ण सिस्टीमला सुरक्षित आणि लीक-प्रूफ बनवण्यासाठी काम करणार आहे.

pralhad joshiSakshi Megha Prabhu

पदभार स्वीकारताच नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी कामाला लागले; शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतली पहिली महत्त्वपूर्ण आढावा बैठक.

NEET पेपर लीकच्या वादानंतर देशाचे नवे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारताच प्रल्हाद जोशी थेट 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत. त्यांनी मंत्रालयाची सूत्रे हाती घेताच शिक्षण मंत्रालय आणि NTA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपत्कालीन आढावा बैठक घेतली. परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करणे, विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणे आणि सिस्टीम सुरक्षित करणे यावर या बैठकीत चर्चा झाली. पहिल्याच दिवशी ही हाय-लेव्हल मिटिंग घेऊन नव्या मंत्र्यांनी पुढील कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

sansadSakshi Megha Prabhu

NEET पेपर लीक आणि तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार संसदेत आज कठोर शिक्षेची तरतूद असलेले 'पब्लिक एक्झामिनेशन्स अमेंडमेंट बिल' मांडणार!

NEET पेपर लीक घोटाळा आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परीक्षा पद्धतीतील गैरप्रकार आणि पेपर लीक करणाऱ्या रॅकेटचा कायमचा बिमोड करण्यासाठी सरकार आज लोकसभेत 'पब्लिक एक्झामिनेशन्स अमेंडमेंट बिल' मांडणार आहे. या नवीन कायद्यामध्ये पेपर लीक, ओएमआर (OMR) शीटमधील फेरफार अशा गुन्ह्यांसाठी अजामीनपात्र वॉरंट, कोट्यवधी रुपयांचा दंड आणि दीर्घकालीन तुरुंगवासाची कडक तरतूद करण्यात आली आहे. नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सिस्टीममध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले जात आहे.

pralhad joshi ImageMadhura Manbhekar

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची जबाबदारी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला. नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्रालयाचा कारभार पाहणार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत आहेत.

Devendra Fadnavis ImageMadhura Manbhekar

संजय राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'मी महाराष्ट्र सोडणार नाही'

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस यांनी "मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे," असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न पक्षीय नसून देशाच्या तरुणाईचे असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले. ठाकरे बंधूंच्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर देत मोदींना देशाचा व्यापक पाठिंबा असल्याचा दावा केला.

धर्मेंद्र प्रधानांचा  मुरली मनोहर जोशी ImageMadhura Manbhekar

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मुरली मनोहर जोशींचे भाष्य; 'विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय'

नीट-यूजी (NEET-UG) परीक्षा प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा समोर आला आहे. या घडामोडीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी "उशिरा का होईना, पण झाले ते चांगले झाले," अशी प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षण क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार नरेंद्र मोदी ImageMadhura Manbhekar

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा दावा; 'मोदींसोबतच्या चर्चेचाच हा परिणाम'

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी मोठा दावा करत सांगितले की, आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या चर्चेचाच परिणाम म्हणून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असे त्यांनी म्हटले. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशातील युवाशक्तीचा विजय संबोधत, आंदोलनादरम्यान झालेला लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर टाळायला हवा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

dharmendra pradhan ImageMadhura Manbhekar

सरकार अखेर झुकले! दिल्ली ते मुंबई पेटलेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

जीनामा पत्रातील मुख्य मुद्दे: ३ मे २०२६ च्या NEET-UG परीक्षेतील अनियमिततेनंतर सीबीआय (CBI) चौकशी, २१ जूनला झालेली पुनरुपरीक्षा आणि १६ जुलैच्या निकालाचा उल्लेख त्यांनी पत्रात केला.

Sonam WangchukMadhura Manbhekar

सरकारसोबत सहमती; 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सरकार आणि वांगचुक यांच्यात सहमती झाली. सरकारने पुढील चर्चेचे आश्वासन दिले असून, वांगचुक यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आणि संवादातून लडाखच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले.

Amazon and  AI  ImageMadhura Manbhekar

Amazon ने AI विभागातील काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रावर मोठी गुंतवणूक करत असलेल्या Amazon ने आपल्या आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) विभागातील काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनीने हा निर्णय AI प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि संसाधनांचे पुनर्वाटप करण्यासाठी घेतल्याचे सांगितले आहे. Amazon सोबतच Microsoft, Google, Meta आणि Uber यांसारख्या कंपन्याही AI-केंद्रित धोरण स्वीकारत असून, पारंपरिक नोकऱ्यांमध्ये घट आणि AI-संबंधित कौशल्यांची मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात टेक क्षेत्रात AI मुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सोनम वांगचुक ImageMadhura Manbhekar

सोनम वांगचुक प्रकरणात केंद्राची हरकत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाने दिली मेडांता रुग्णालयात हलवण्याची परवानगी

नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना गुरुग्राममधील मेडांता रुग्णालयात हलवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. उपचारासंदर्भातील अंतिम निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतला जावा, अशी भूमिका केंद्र सरकारने न्यायालयात मांडली. सध्या वांगचुक यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.

कंगना रनौत ImageMadhura Manbhekar

मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीवर कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नीट (NEET) परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केले. या आंदोलनावर भाजप खासदार कंगना रनौत यांनी टीका करत, आंदोलनासाठी जंतर-मंतर निश्चित असताना राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे का गेले, असा सवाल उपस्थित केला. त्यांनी या घटनेला सुरक्षेतील त्रुटी असल्याचे म्हटले. दुसरीकडे राहुल गांधी यांनी नीट प्रकरणावर संसदेत चर्चा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

PM Modi Sharad Pawar ImageMadhura Manbhekar

मोदी-पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ; अखेर भेटीमागचं कारण आलं समोर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. भेटीदरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, कृषी आणि सिंचनाशी संबंधित प्रश्नांवर पंतप्रधानांना निवेदन देत शेतकरी आत्महत्या, MSP, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि बनावट बियाण्यांवर प्रभावी उपाययोजनांची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस ImageMadhura Manbhekar

दिल्लीतील लाठीमार योग्यच"; आंदोलनावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला पोलिसांचा लाठीमार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी तो शांततेत आणि कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन नेतृत्वविहीन असल्याने काही स्वार्थी प्रवृत्ती आणि राजकीय पक्ष त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, हिंसाचार आणि अराजकता निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी संयमाने कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील आंदोलन ImageSakshi Megha Prabhu

दिल्लीतील आंदोलनानंतर खळबळ; 150 विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा

नवी दिल्ली : संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. या कारवाईत सुमारे 150 विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला. काही विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या आरोपांवर दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आणि या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

कुणाल कामरा ImageSakshi Megha Prabhu

जंतरमंतरवरील कथित वक्तव्यावरून कुणाल कामरा, अभिजीत दिपके यांच्याविरोधात सायबर तक्रार

दिल्लीतील जंतरमंतर येथे कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीत व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करून BNS 2023 आणि IT कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसून तक्रारीची पडताळणी सुरू आहे.

उपोषणादरम्यान सोनम वांगचुक ImageSakshi Megha Prabhu

उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; सफदरजंग रुग्णालयात दाखल

जंतर-मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईला आंदोलकांनी विरोध केला असून, पेपरफुटी प्रकरण, नीट परीक्षा व शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे.

NEETSakshi Megha Prabhu

NEET पेपर लीक प्रकरणाला नवे वळण; आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले 132 प्रश्न

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणाच्या तपासात CBIच्या हाती महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागले आहेत. आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्रीचे 132 प्रश्न सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रश्न मिळवण्यासाठी सुमारे 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय असून, अनेक राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या पेपर लीक रॅकेटचा तपास सुरू आहे. मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे CBI इतर आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा; NEET घोटाळ्यावर गंभीर प्रश्न

दिल्ली — सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले उपोषण आज 19व्या दिवशी पोहोचले आहे. 28 जूनपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीत चिंताजनक बिघाड झाला असून, त्यांचे वजन सुमारे 8.9 किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे NEET-UG पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.