Sukanya Peraneसाहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठा पेच! आयफोन अद्याप लॉक; ChatGPT प्रकरणाचं गूढ उलगडणार?
आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची अडचण समोर आली आहे. साहिलचा आयफोन अद्याप अनलॉक झालेला नसल्याने डिजिटल पुराव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई क्राईम ब्राँच तांत्रिक मदत घेत आहे. फोनमधील माहितीवरून परीक्षेदरम्यान ChatGPT वापरल्याच्या आरोपांबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजही काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
















