Sukanya Peraneएअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे पहिले CEO; तीन वर्षे सांभाळणार मंदिराच्या प्रशासनाची धुरा
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मंदिराचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. तब्बल 5500 हून अधिक अर्जांमधून 18 उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आल्यानंतर जितेंद्र मिश्रा यांची निवड झाली. कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मिश्रा यांच्यासमोर आता राम मंदिराचा प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर कारभार अधिक पारदर्शकपणे हाताळण्याचे आव्हान असणार आहे.
