परिसर

पुणे/मुंबई

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

accident imageMadhura Manbhekar

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; वाकडच्या तरुणाचा मृत्यू

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे १.२० वाजता भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरने पुढे जात असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने उलटली. या अपघातात वाकड येथील तुषार भूमकर (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर फॉर्च्युनरमधील चार आणि टेम्पोमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना एमएसआरडीसीच्या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतरही वाहतूक सुरळीत सुरू होती. प्राथमिक तपासात अतिवेगामुळे अपघात झाल्याचा अंदाज असून, नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

accidentsahir shaikh

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव एसयूव्हीची ट्रकला धडक; 2 ठार, 5 जखमी

खालापूरजवळ माडप बोगदा ओलांडल्यानंतर सुमारे 25 किमी अंतरावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाले. सेवा रस्त्यावर बंद पडलेल्या ब्रेकडाउन ट्रकला भरधाव एसयूव्हीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

monkey hillSakshi Megha Prabhu

मंकी हिल येथे दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम; 16 गाड्या रद्द, 6 गाड्यांचे मार्ग बदलले

मुंबई विभागातील मंकी हिल (Monkey Hill) घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने १६ रेल्वे गाड्या रद्द केल्या असून ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट आणि रीशेड्यूल करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी रेल्वेची ताजी माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.