परिसर

पिंपरी-चिंचवड

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

dhajkhdskSakshi MEgha Prabhu

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीत आगीचे तांडव! फटाक्यांमुळे ५० ठिकाणी आग; २५ घरं आणि फ्लॅटना फटका

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे रविवारी रात्री जवळपास ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये सुमारे २५ घरं आणि फ्लॅटसह मोकळी मैदाने, गवत, कचरा आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य मोठे अपघात टळले.

Pune_Suicide_CaseSukanya Perane

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! १८ व्या मजल्यावरून पडून आई-मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. १८ व्या मजल्यावरून पडल्याने एकता भांगड आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा माधव यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Aarya Kamble - Devendra FadanvisSukanya Perane

पायाला गंभीर दुखापत, तरीही ८० जणांचे प्राण वाचवले! पिंपरी-चिंचवडच्या २० वर्षीय आर्याच्या शौर्याला मुख्यमंत्र्यांचा सलाम

पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून ७० ते ८० रहिवाशांना सतर्क करणाऱ्या २० वर्षीय आर्या कांबळेच्या धाडसाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने पायाला दुखापत होऊनही आर्याने इमारतीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास मदत केली. या आगीत २१ वाहनांचे नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन पत्र पाठवून आर्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

Commissioner Vijay Suryawanshi has issued show-cause noticesSukanya Perane

PCMC मध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आयुक्तांच्या रडारवर; YCM अधिष्ठाता आणि उद्यान अधीक्षकांना नोटीस

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी YCM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाबळे यांच्यावर सहाय्यक प्राध्यापकाचा अपमान केल्याचा, तर गारगोटे यांच्यावर पिंपरीतील ५२ वारसावृक्षांच्या तोडीसाठी परवानगी देताना कथित अनियमितता केल्याचा आरोप आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, खुलासा असमाधानकारक आढळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

Pimpri_Chinchwad NewsSukanya Perane

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री भीषण आग! कुणाल मार्केटच्या पार्किंगमधील २१ वाहने जळून खाक; एक जण जखमी

पिंपरी-चिंचवडमधील चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहने जळून खाक झाली असून, एक पुरुष जखमी झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Police_Cops_Heart AttackSukanya Perane

ड्रग्ज तस्कराचा पाठलाग करताना हवालदार जावेद बागसिराज यांचा मृत्यू; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांविरोधात कारवाई करताना पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. संत तुकारामनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. एका संशयिताला पकडल्यानंतर पळून जाणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा पाठलाग करताना जावेद यांची प्रकृती अचानक बिघडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Tukaram-MundheSukanya Perane

'दुष्काळातही करोडपती शेतकरी होता येतं' तुकाराम मुंढेंनी सांगितला यशाचा मार्ग; दुग्ध व्यवसायाबाबत मोठं विधान!

दुष्काळाकडे केवळ संकट म्हणून न पाहता त्यातून व्यवसायाच्या संधी शोधण्याचा सल्ला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये त्यांनी दुग्ध व्यवसाय, कमी पाण्यात चारा उत्पादन आणि जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. हिवरेबाजारचे उदाहरण देत गावातील पाणी गावातच अडवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

CrimeSukanya Perane

मंदिरातही मुली सुरक्षित नाहीत? निगडीत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; संशयित कामगाराला अटक

पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने धाडसाने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, निगडी पोलिसांनी संशयित कामगाराला ताब्यात घेतले आहे.

नोकरी गेली, वाढला आर्थिक ताण; पिंपरीत कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

सारांश : पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडी परिसरात आर्थिक अडचणींमुळे एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला असून पत्नी आणि मुलगी यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक विवंचनेचा उल्लेख असून, मोबाईल, ऑनलाइन व्यवहार आणि इतर पुराव्यांच्या आधारे संत तुकारामनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इमारत दुर्घटनाMadhura Manbhekar

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्यातून एकाचा मृतदेह बाहेर; भावेश वाणी गंभीर जखमी, बचावकार्य सुरू

Summary मोशी कचरा डेपो परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी G+2 आरसीसी इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी भावेश वाणी यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

imaransahir shaikh

मोशी कचरा डेपो परिसरात भीषण दुर्घटना; 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची इमारत कोसळली

मोशी कचरा डेपो परिसरात 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.

suicideSakshi Megha Prabhu

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या, मृत्यूमागील कारण अद्याप गूढ

थेरगावमधील खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. श्वेता रोकडे यांचे निधन; एमबीबीएस डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ