बारामती एअरस्ट्रीपजवळ रविवारी एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षण विमानाचे क्रॅश-लँडिंग झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, जानेवारीत याच परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 13 मे रोजीही बारामतीजवळ प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला होता, मात्र त्यातील प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित बचावला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती एअरस्ट्रीपवरील विमान सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, शारीरिक संबंध आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बारामतीच्या श्रावणी कुदळेने री-नीट परीक्षेत देशात पाचवा, मुलींमध्ये पहिला आणि महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवले असून बायोलॉजीमध्ये पूर्ण 360 गुण मिळवले. सातवीपासून नीटची तयारी करणारी श्रावणी आता दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनून देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.