Sukanya Peraneडान्स क्लासला जाण्यावरून वाद, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्टने उलगडलं धक्कादायक सत्य
नागपुरात डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद हिंसक झाला. पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असून, गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आणि पोलिसांनी पतीला अटक केली.