परिसर

कोल्हापूर

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

Raju_ShettySukanya Perane

साखर कारखानदारांविरोधात राजू शेट्टी आक्रमक; ऊस दरासाठी हजारो शेतकऱ्यांसह किणी टोलवर आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि वाढीव ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Swabhimani_Shetkari_SanghtnaSukanya Perane

ऊसाला 5 हजारांचा दर द्या, अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही! कोल्हापुरातील बैठक निष्फळ; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

कोल्हापुरात ऊसदराच्या प्रश्नावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. पहिली उचल 4,500 रुपये आणि उसाला 5,000 रुपये दर मिळावा, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. दरम्यान, चार दिवसांत नदीत पाणी न आल्यास कोयना धरणावर जाऊन स्वतः पाणी सोडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Kolhapur_Gold Theft_NewsSukanya Perane

चुलत्याचं 15 तोळे सोनं चोरून पुतण्याने घेतली थार! पूजेला चुलत्यालाच बोलावलं अन् झाला चोरीचा पर्दाफाश!

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात 19 वर्षीय तरुणाने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून त्यातून मिळालेल्या पैशांत नवी थार खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातून चोरी झाली, त्यांनाच गाडीच्या पूजेसाठी आमंत्रित केल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी पुतण्यासह सोनाराला अटक केली आहे.

Kolhapur_CrimeSukanya Perane

कोल्हापूर पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या गोळ्यांचा थरार; सराईत गुन्हेगार महेश दळवीची हत्या, मारेकरी फरार!

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दळवी यांचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Murder_Kolhapur_CrimeSukanya Perane

नववीतील मुलीची धारदार शस्त्राने हत्या! माणगावात संतापाचा उद्रेक; महिलांचा मोर्चा, फाशीच्या शिक्षेची मागणी

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १५ वर्षीय शाळकरी मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महिलांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे.