Minaz Shaikhबेंगळुरू: १३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांवर गंभीर आरोप
बेंगळुरूमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शाळेतील शिक्षकांवर मानसिक छळ आणि अपमान केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.
