Sukanya Peraneजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानशी संबंधित संशयित नेटवर्कचा पर्दाफाश! 4 महिलांसह 6 जणांना अटक; 8 लाखांच्या व्यवहारांचा तपास
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बंदी घातलेल्या 'इत्तेहाद-उल-मुस्लिमीन' संघटनेशी कथित संबंध असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश असून, या नेटवर्कला पाकिस्तानातून निधी मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासात 7 ते 8 लाख रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आले आहेत.
