परिसर

बीड

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

Cyber_Crime - WomenSukanya Perane

टँगो ॲपवर प्रेमाचे जाळे, खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बीडच्या व्यापाऱ्याला 47 लाखांचा गंडा!

बीडमध्ये टँगो ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून एका उच्चशिक्षित व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्याची धमकी देत नेपाळमधील दोन महिलांनी व्यापाऱ्याकडून तब्बल 47 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Khajana_Water Well BeedSukanya Perane

बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली! 450 वर्षे जुनी ऐतिहासिक खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच कोरडी; मराठवाड्यावर जलसंकटाचे संकेत

बीड आणि पाली गावाजवळील सुमारे 450 वर्षे जुनी निजामकालीन खजाना विहीर यंदा ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. या विहिरीतील पाणी तळाला जाणे हे दुष्काळ आणि संभाव्य जलसंकटाचे संकेत मानले जात आहेत. इतिहास अभ्यासक प्रा. सतीश साळुंखे यांनी विहिरीच्या संवर्धनाची मागणी करत महाराष्ट्र शासनाने तिला संरक्षित स्मारक घोषित करण्याचे आवाहन केले आहे.

Fadnvis_MundheSukanya Perane

विलास घुले हत्याप्रकरणावरून बीडचं राजकारण तापलं; बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांशी भेट

विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडवर आपल्या मुलाला अडकवण्यासाठी कारागृहातून कट रचल्याचा गंभीर आरोप करत कथित ऑडिओ क्लिप सादर केली आहे. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्रित देण्याची मागणी केली. त्यामुळे बीडमध्ये हत्या प्रकरण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Beed_TrainSukanya Perane

बीडकरांसाठी आनंदाचा दिवस! पहिल्यांदाच थेट पुण्यासाठी धावली रेल्वे; सुनेत्रा पवारांनी सांगितलं ‘त्या’ शब्दामागचं कारण

मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देणारी बीड-पुणे रेल्वे सेवा आज सुरू झाली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी या प्रकल्पामागे अजित पवारांचे प्रयत्न असल्याचे सांगत बीड-पनवेल थेट रेल्वेसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Beed Crime Vilas Ghule ImageSakshi Megha Prabhu

विलास घुले केसमध्ये धक्कादायक खुलासा; उमेश मानेविरोधात गुन्हा दाखल

बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. उमेश माने याच्याविरोधात एका महिलेने अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याची तक्रार दिल्यानंतर केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नव्या घडामोडीमुळे प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.