Sukanya Peraneअन् शिंदेंसमोर शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला! 'तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला'; अकोल्यात भावनिक प्रसंग
अकोल्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शेतकरी समाधान सुरकर यांना अश्रू अनावर झाले. पावसाअभावी पाच एकर शेतीतील सोयाबीन आणि तुरीचे पीक वाळल्याने हतबल झालेल्या सुरकर यांनी आपली व्यथा मांडली. आत्महत्येचा विचार मनात आला होता; मात्र तुम्हाला भेटल्यानंतर तो दूर झाल्याचे त्यांनी शिंदेंना सांगितले.
