Sakshi Megha Prabhuपुण्यात दिवाळीत आगीचे तांडव! अवघ्या १० तासांत ८१ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ
पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे अवघ्या १० तासांत आगीच्या तब्बल ८१ वर्दी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाल्या. कोंढवा, कोथरूड, खराडी, कात्रज, धायरीसह शहरातील विविध भागांत घरं, दुकानं, गोडाऊन, वाहनं आणि झाडांना आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ उडाली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.